WordPress श्रेय
प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणातून पुढील पिढीतील योगदानकर्त्यांना मार्गदर्शन.
कार्यक्रमाबद्दल
'WordPress Credits' हा WordPress Foundation द्वारे राबवला जाणारा एक योगदान-आधारित कार्यक्रम आहे, जो उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना जागतिक मुक्त स्रोत (Open Source) समुदायाशी जोडतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन (mentorship) उपलब्ध करून देतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना WordPress मध्ये थेट योगदान देत असतानाच, आपल्या शैक्षणिक आवश्यकता पूर्ण करण्यास मदत मिळते.
पिसा विद्यापीठाच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेला आणि 'WordCamp Europe 2025' मध्ये जाहीर झालेला हा कार्यक्रम सातत्याने विस्तारत असून, WordPress परिसंस्थेतील विद्यार्थी, विद्यापीठे आणि कंपन्या यांच्यात सहयोगाला चालना देत आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेला वेळ आणि केलेले काम यांना त्यांच्या संस्थेकडून शैक्षणिक क्रेडिट्स, इंटर्नशिपचे तास किंवा प्रकल्पकार्य म्हणून औपचारिक मान्यता मिळू शकेल, अशा प्रकारे हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

हे कसे कार्य करते
हा कार्यक्रम साधारणपणे एका शैक्षणिक सत्रासाठी चालतो आणि तो तीन मुख्य टप्प्यांचे अनुसरण करतो:
- रुजू करून घेणे
- प्रकल्प कार्य (योगदान)
- सारांश
या कार्यक्रमाद्वारे, विद्यार्थी WordPress परिसंस्थेतील कंपन्यांमधील स्वयंसेवक आणि व्यावसायिकांशी सहकार्य करतात.
हा कार्यक्रम सामान्यतः एका शैक्षणिक सत्रासाठी चालतो आणि विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोन स्वरूपांमध्ये (50 तास आणि 150+ तास) उपलब्ध आहे. त्यात तीन मुख्य टप्पे आहेत: ओनबोर्डिंग, प्रकल्प आणि रॅपअप.
रुजू प्रक्रिया
मार्गदर्शक आणि स्थानिक संघांशी जोडले जात असताना, विद्यार्थ्यांना WordPress साधने, समुदाय संस्कृती आणि मुक्त स्रोत (Open Source) सहयोगाबाबत प्रशिक्षण मिळते.
प्रकल्प कार्य
विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात—जसे की अनुवाद, आशय निर्मिती, कार्यक्रम आयोजन, विकास किंवा रचना—वैयक्तिक योगदानाचा एक प्रकल्प विकसित करतात.
सारांश
विद्यार्थी आपले काम सादर करतात, आपले विचार मांडतात आणि भविष्यातील सहभागींसाठी हा कार्यक्रम सुधारण्यास मदत करतात.
तुमच्या कार्यक्रमासाठी दोन त्रॅक
WordPress क्रेडिट्स दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून संस्था कार्यक्रम आपल्या शैक्षणिक आवश्यकता आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळानुसार जुळवून घेउ शकतात.
WordPress क्रेडिट्स — 50 तास. एका एकल मार्गदर्शित योगदान प्रकल्पाभोवती तयार केलेला संकुचित त्रॅक. छोट्या मॉड्युल्स, निवडक विषय, किंवा ओपन सोर्सशी पहिल्या ओळखीसाठी उत्तम.
WordPress क्रेडिट्स — 150+ तास. संपूर्ण कार्यक्रम. ते किमान 150 तासांपासून सुरू होते आणि संस्थेच्या गरजेनुसार वाढवले जाउ शकते (अाजवर आम्ही ते 400 तासांपर्यंत चालवले आहे). यात संकुचित त्रॅकमधील सर्व गोष्टींसह अधिक ओनबोर्डिंग अभ्यासक्रम, नियमित प्रगती अपडेट्ससह वैयक्तिक वेबसाइट तयार करणे, मध्यमी अभिप्राय, आणि जागतिक WordPress समुदाय आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग संमिलित आहे. इंटर्नशिप, कॅपस्टोन प्रकल्प किंवा संपूर्ण सेमेस्टर अभ्यासक्रमासाठी उत्तम.
दोन्ही त्रॅक एकाच प्रकारे संपतात: विद्यार्थी आपले काम सादर करतात, अभिप्राय फॉर्म भरतात आणि प्रमाणपत्र मिळवतात.
WordPress Credits मध्ये सहभागी का व्हावे
विद्यार्थ्यांसाठी
- प्रत्यक्ष WordPress प्रकल्प तयार करा आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करा.
- अनुभवी मार्गदर्शकांकडून शिका.
- प्रत्यक्ष अनुभवातून आत्मविश्वास मिळवा.
- जागतिक मुक्त स्रोत समुदायाशी जोडून घ्या.
मार्गदर्शकांसाठी
- विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण अध्ययन अनुभव मिळवून द्या.
- स्वतःची नेतृत्व कौशल्ये बळकट करताना ज्ञानाचे आदानप्रदान करा.
- तुमची संस्था किंवा समुदाय जागतिक WordPress परिसंस्थेशी जोडा.
संस्थांसाठी
WordPress क्रेडिट्स संमिलित करण्याचे लवचिक मार्ग
प्रत्येक संस्था ठरवते की कार्यक्रम तिच्या शैक्षणिक रचनेत कसे बसते. सर्वात सामान्य पद्धती आहेत:
- इंटर्नशिप म्हणून — विद्यार्थी ईन्त्रणसह तास पूर्ण करतात जे इंटर्नशिप किंवा काम-प्लेसमेंट आवश्यकतेत मोजतात.
- एंबेडेड मॉड्युल म्हणून — कार्यक्रम किंवा त्यातील निवडक अभ्यासक्रम विद्यमान विषयात संमिलित करा.
- पदवीपूर्व प्रकल्प म्हणून — विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची समाप्ती होण्यापूर्वी पूर्ण करायच्या व्यावहारिक किंवा कॅपस्टोन प्रकल्पात वापरा.
- निवडक किंवा अभ्यासेतर क्रेडिट म्हणून — ते स्वतंत्र निवडक म्हणून ओफर करा.
हे सर्वात सामान्य मॉडेल आहेत, आगीचे नाहीत. तुमच्या संस्थेसाठी कार्य करणार्या कोणत्याही व्यवस्थेबद्दल आम्ही चर्चा करण्यास आनंदी आहोत — आमचे ध्येय आहे की विद्यार्थ्यांनी गुंतवलेला वेळ आणि मेहनत त्यांच्या शाळेने वा विद्यापीठाने अधिकृतपणे मान्य करण्यात यावी.
कंपन्यांसाठी
- मुक्त स्रोत शिक्षण आणि नवोदित WordPress व्यावसायिकांना पाठिंबा देणारी कंपनी म्हणून वाढलेली दृश्यमानता.
- मार्गदर्शित प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवणाऱ्या, उत्साही विद्यार्थ्यांशी थेट संपर्क.
- प्रभावशाली सामुदायिक उपक्रमांचा समर्थक म्हणून WordPress परिसंस्थेमध्ये प्रतिष्ठा अधिक बळकट केली.
- दीर्घकालीन परस्पर फायद्यासाठी मार्गदर्शक, संस्था आणि योगदानकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या संधी
तुमच्या संस्थेला काय मिळते
- पूर्ण आणि अंमलबजावणीसाठी सज्ज असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमाचा विनामूल्य ॲक्सेस
- वास्तविक जगातील ओपन सोर्स अनुभवाचे अभ्यासक्रमात थेट एकत्रीकरण करण्याची क्षमता
- व्यावहारिक प्रकल्प कामाद्वारे विद्यार्थ्यांचा वाढलेला सहभाग
- शिक्षकांना भविष्यातील मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित होण्याची संधी, ज्यामुळे अंतर्गत क्षमता बळकट होतील.
- WordPress Foundation सोबतची एक अधिकृत भागीदारी — जी उच्च-गुणवत्तेचे डिजिटल शिक्षण आणि जागतिक मुक्त स्रोत (Open Source) सहकार्याप्रती या संस्थेची कटिबद्धता अधोरेखित करते.
यशोगाथा
“WordPress Credits प्रकल्पातील माझा अनुभव खरोखरच समृद्ध करणारा ठरला आहे. अगदी सुरुवातीपासूनच, मला सतत पाठिंबा मिळत असल्याचे आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे जाणवले आहे. वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर, माझे पर्यवेक्षक (Supervisor) अत्यंत उत्कृष्ट आहेत; ते माझ्या प्रश्नांकडे नेहमीच लक्ष देतात, त्वरित प्रतिसाद देतात आणि मदत करण्याची त्यांची तयारीही मनापासून असते.“
नाझरेथ
फिडेलितास विद्यापीठ
“मला हा प्रकल्प माझ्या शैक्षणिक वाटचालीसाठी मनोरंजक आणि उपयुक्त वाटतो. या निमित्ताने मला माझी डिजिटल कौशल्ये विकसित करण्याची आणि माझ्या संवादकौशल्यांचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधी मिळाली. शिवाय, मला एका सक्रिय, गतिमान आणि अत्यंत सहकार्यपूर्ण समुदायाचा भाग होण्याची संधी लाभली; या समुदायातील प्रत्यक्ष भेटीगाठी माझ्या या प्रवासाला अधिक समृद्ध करण्यासाठी अत्यंत सहाय्यक ठरल्या.“
लिओनार्डो
पिसा विद्यापीठ
“या प्रकल्पाचा भाग होताना, एखाद्या विशाल सर्जनशील समुदायाचा सदस्य असल्याचा अनुभव मला आला; असा समुदाय जो काहीतरी अर्थपूर्ण, सतत बदलणारे आणि निरंतर विकसित होणारे निर्माण करण्यासाठी एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर असतो. या कार्यक्रमामुळेच मला एका अत्यंत व्यापक प्रकल्पात प्रत्यक्ष स्वरूपात योगदान देण्याची संधी मिळाली—ज्यायोगे माझ्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होण्यास मदत होईल.“
अरियाना
पिसा विद्यापीठ
“या प्रकल्पामुळे मला खरोखरच एक अत्यंत सकारात्मक अनुभव मिळाला: या संपूर्ण प्रवासात मला सतत आधाराची जाणीव झाली; तसेच, मला स्वतःची वाढ करून घेण्याची, माझी कौशल्ये विकसित करण्याची आणि यापूर्वी मला माहित नसलेल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. जर तुम्ही अशा एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल, जिथे तुमचे मनापासून आणि अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले जाईल, तर हेच ते ठिकाण आहे.“
जुलिया
पिसा विद्यापीठ
सहभागी संस्था
सध्या 'WordPress Credits' मध्ये सहभागी असलेल्या संस्था तपासा. जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि योगदानकर्त्यांना एकमेकांशी जोडून, या संस्था एकत्रितपणे मुक्त स्रोत (Open Source) शिक्षणाला चालना देत आहेत.
If your institution would like to join this growing network, please register your interest so we can connect and explore the next steps together.

फिडेलितास विद्यापीठ
सॅन होजे, कोस्टा रिका

रिगा नॉर्डिक विद्यापीठ
रिगा, लात्व्हिया

फ्रांझ तामायो खाजगी विद्यापीठ
सांताक्रूझ आणि कोचाबांबा, बोलिव्हिया

पिसा विद्यापीठ
पीसा, इटली

अहमदचे शिक्षण
ढाका, बांगलादेश

क्राकोव अर्थशास्त्र विद्यापीठ
क्राको, पोलंड

क्राको तंत्रज्ञान विद्यापीठ
क्राको, पोलंड

अझारक्विएल माध्यमिक विद्यालय
टोलेडो, स्पेन

क्रिएटिव्ह कॅम्पस – युनिव्हर्सिटी युरोप
माद्रिद, स्पेन

सेंट्रल न्यू मेक्सिको कम्युनिटी कॉलेज
अल्बुकर्क, अमेरिका

ड्रू विद्यापीठ
मॅडिसन, अमेरिका

Escuela de Arte Toledo
टोलेडो, स्पेन

Escuela de Arte de Huesca
Huesca, Spain

ERAP संशोधन आणि अध्ययन LLP
कोलकाता, भारत

Juraj Dobrila University of Pula
Pula, Croatia

Escuela de Arte de Zaragoza
Zaragoza, Spain

IES Venancio Blanco
Salamanca, Spain

झारागोझा दीनामीच(Zaragoza Dinámica)
Zaragoza, Spain

Texas International College
काठमांडू, नेपाळ

Haaga-Helia University of Applied Sciences
हेलसिंकी, फिनलंड

D. Y. Patil School of Engineering and Management
कोल्हापूर, भारत

Institut Provençana
लॉस्पितालेत दे लोब्रेगात, स्पेन

SAE Athens
अथेन्स, ग्रीस

Instituto de Educación Secundaria Mar de Alborán
एस्तेपोना, स्पेन

D. Y. Patil Agriculture and Technical University
कोल्हापूर, भारत

CUNY – New York City College of Technology
न्यू यॉर्क शहर, अमेरिका

Wschodnioeuropejska Akademia Nauk Stosowanych w Białymstoku
बियाविस्टोक, पोलंड

Liceo HHC Experimental Bilingue José Figueres Ferrer
कार्तागो, कोस्टा रिका

Universidad de Diseño Innovación y Tecnología
माद्रिद, स्पेन

CPR Liceo La Paz
आ कोरुन्या, स्पेन

E-zone School of Computing
कंपाला, युगांडा
आमचे mentors आणि admins यांना भेटा
आमचे मार्गदर्शक आणि कार्यक्रम प्रशासक हे वर्डप्रेस क्रेडिट्सचा कणा आहेत. मार्गदर्शक विद्यार्थ्यांना ओपन सोर्स योगदानाच्या त्यांच्या पहिल्या टप्प्यात मार्गदर्शन करतात, त्यांना अर्थपूर्ण प्रकल्प निश्चित करण्यास, आत्मविश्वास वाढवण्यास आणि वर्डप्रेस टीम्ससोबत प्रत्यक्ष सहकार्यातून व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात. कार्यक्रम प्रशासक हे सुनिश्चित करतात की विद्यार्थ्यांच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा सुरळीतपणे पार पडेल, मग ते ऑनबोर्डिंग आणि प्रकल्प समन्वय असो किंवा शैक्षणिक भागीदारी आणि समुदाय एकीकरण असो. ते सर्व मिळून एक असे सहाय्यक शिक्षण वातावरण तयार करतात, जे विद्यार्थ्यांना उद्देशपूर्ण योगदान देण्यासाठी, नवीन संधी मिळवण्यासाठी आणि जागतिक वर्डप्रेस इकोसिस्टममध्ये सक्रिय सहभागी बनण्यासाठी सक्षम करते.
आमचे प्रायोजक












WordPress.com डोमेन, १ वर्षाचे मोफत होस्टिंग आणि नूतनीकरणावर ५०% सूट देते.

Weglot तुमच्या वेबसाइटचे भाषांतर करण्यासाठी Weglot चा 'Business Plan' एका वर्षासाठी मोफत उपलब्ध करून देते.

सहभाग कसा घ्यावा
विद्यार्थी म्हणून सामील व्हा
जागतिक मुक्त स्रोत (Open Source) समुदायाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवा, मार्गदर्शकांसोबत सहकार्य करा, WordPress प्रकल्पांमध्ये योगदान द्या आणि तुमच्या भविष्यातील कारकिर्दीला चालना देणारी कौशल्ये विकसित करा.
मार्गदर्शक बना
तुमचा अनुभव सामायिक करा आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातील 'ओपन सोर्स' प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करण्यास मदत करा; तसेच, ते शिकत असताना आणि प्रगती करत असताना त्यांना अभिप्राय, आधार आणि योग्य दिशा द्या.
भागीदार संस्था बना
आमचे भागीदार बना आणि विद्यार्थ्यांना एका जागतिक 'ओपन सोर्स' प्रकल्पात योगदान देत असतानाच, प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याचा एक अर्थपूर्ण मार्ग उपलब्ध करून द्या. या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे, तुम्हाला नाविन्यपूर्ण आणि प्रत्यक्ष सरावावर आधारित शिकण्याच्या संधी थेट तुमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे शक्य होते.
कंपनी म्हणून योगदान द्या
मार्गदर्शक प्रायोजकत्वे, उपयुक्त साधने व संसाधने, किंवा कार्यक्रमाचा अनुभव समृद्ध करणाऱ्या इतर योगदानांद्वारे विद्यार्थ्यांना साहाय्य करून, मुक्त स्रोत समुदायाला बळकट करा.
समुदायात सामील व्हा
कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, सहयोगाने काम करण्यासाठी आणि इतर आयोजकांशी जोडलेले राहण्यासाठी #wpcredits Slack चॅनेलमध्ये सामील व्हा.
तुम्हाला अजूनही प्रश्न असल्यास किंवा अधिक तपशील हवे असल्यास, तुम्ही या हँडबुकमध्ये सर्व काही शोधू शकता.